साईंच्या दर्शनासाठी जाण्यापूर्वी या गोष्टी नक्की लक्षात ठेवा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद असलेली राज्यातील मंदिरे उघडण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. राज्यभरातील मंदिरं खुली करण्यास परवानगी दिल्यानंतर जगप्रसिद्ध असलेले शिर्डीतील साईमंदिराच्या दर्शनासाठी विविध नियम करण्यात आले आहेत.

शिर्डी येथील श्रीसाई मंदिर कोरोनामुळे 17 मार्च रोजी बंद करण्यात आले होते. आता राज्य सरकारच्या परवानगीने धार्मिक स्थळे उघडणार आहे. त्यामुळे तब्बल आठ महिन्यांनी भाविकांसाठी साई मंदिर उघडले जाणार आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिरात एकाचवेळी दर्शनासाठी गर्दी होऊ नये, यासाठी नियोजन सुरू करण्यात आले आहे.

त्यासाठी आज शिर्डी येथे प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक सुद्धा झाल्याचे समजते आहे. शिर्डी येथे श्रीसाई बाबांच्या दर्शनासाठी जगभरातून भाविक येत असतात. मात्र, 17 मार्चपासून मंदिर बंद असल्यामुळे येथील अर्थकारणाची घडी संपूर्ण विस्कटली होती. छोटमोठ्या व्यवसायावर अवलंबुन असणाऱ्या अनेकांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होता.

मंदिर उघडण्यास केव्हा परवानगी मिळेल, याकडे भाविकांसह या भागातील नागरिकांचे लक्ष लागले होते. आता पाडव्यापासून मंदिर उघडण्यात येणार असल्यामुळे येथील अर्थकारणाची घडी रुळावर येण्यास हळूहळू सुरुवात होणार आहे

साई मंदिरात दर्शनासाठी कसे असतील नियम?

  • दहा वर्षाच्या आतील मुले व 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना दर्शनाची परवानगी नसेल
  • दर्शनबारीत सहा फुटाचे अंतर ठेवावे लागणार
  • मास्क लावणे बंधनकारक असणार
  • ज्यांना कोविडची कोणतीही लक्षणे नाहीत त्यांनाच साईमंदिरात प्रवेश
  • ज्यांना शक्य असेल त्यांनी आपला कोरोना रिपोर्ट सोबत आणावा
  • संशयीत भाविकांची शिर्डीत होणार कोरोना टेस्ट
  • साईबाबांच्या चारही आरतीला केवळ 80 लोकांना सहभागी होता येणार
  • शिर्डीतील ग्रामस्थांना सकाळी एक तास दर्शनाला परवानगी
  • शिर्डीकरांना सकाळी 05:45 ते 06:45 या वेळेतच दर्शन
  • 3000 भाविकांना ऑनलाईन पास दिले जाणार
  • 3000 भक्तांना शिर्डीतील भक्तनिवासात दिले जाणार पास
  • साईदर्शनाला जाताना फुल हार नेण्यास बंदी
  • मोबाईलफोन आणि इतर सामान नेण्यास बंदी
  • शिर्डीत असणार जमावबंदी

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment