खातेदारांनो लक्ष द्या! या बँकेतून पैसे काढण्यावर आली मर्यादा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2020 :- अवाजवी कर्जवाटप, अनियमिततेने आर्थिक संकटात सापडल्या लक्ष्मी विलास बँकेवर आज मंगळवारी केंद्र सरकारने निर्बंध घातले आहेत. पुढील ३० दिवसांसाठी हे निर्बंध राहतील.

रिझर्व्ह बँकेच्या प्रस्तावानंतर केंद्र सरकारने ही कारवाई केली आहे. यापूर्वीच सप्टेंबर २०१९ मध्ये लक्ष्मी विलास बँकेवर प्रॉम्प्ट करेक्‍टिव्ह ऍक्‍शनअंतर्गत निर्बंध घातले होते. या कारवाईमुळे येत्या महिनाभरासाठी खातेदारांना केवळ २५ हजार रुपयांची रोकड काढता येणार आहे. ही मर्यादा 16 डिसेंबरपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.

मागील तीन वर्षे लक्ष्मी विलास बँकेला तोटा झाला आहे. बँकेच्या बुडीत कर्ज मोठी वाढ झाली आहे. बॅंकेची व्यावसायिक रणनीती सपशेल अपयशी ठरल्याने रिझर्व्ह बँकेला आज कारवाई करावी लागली आहे लक्ष्मी विलास बँकेच्या आधी पीएमसी आणि येस बँकेतून रक्कम काढण्यासंबंधी निर्बंध लागू केले होते. लक्ष्मी विलास बँक ही एक व्यावसायिक बँक आहे.

या बँकेच्या 563 शाखा आहेत आणि जवळपास 974 एटीएम आहेत. खाजगी क्षेत्रातील लक्ष्मी विलास बँकेच्या संचालक मंडळाच्याऐवजी आता रिझर्व्ह बँकेनं प्रशासकाची नियुक्ती केली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reservedpp

Leave a Comment