देशाचा अर्थसंकल्प बनविण्यासाठी तुम्हीही पाठवा सरकारला सूचना ; ‘अशी’ करा प्रोसेस

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2020 :-केंद्र सरकारने 2021-22 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प तयार करण्याची तयारी सुरू केली आहे. अर्थ मंत्रालयाने यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

अर्थ मंत्रालय अर्थसंकल्पातील सूचनांसाठी विविध औद्योगिक व इतर संस्थांशी चर्चा करीत आहे. दरम्यान, अर्थ मंत्रालयाने बजेटसंदर्भात सर्वसामान्यांच्याही सूचना मागविल्या आहेत. चला जाणून घेऊया या सूचना कशा पाठवायच्या …

अशा द्या सूचना :- त्यासाठी अर्थ मंत्रालयाने MyGov प्लॅटफॉर्मवर मायक्रो-साइट (ऑनलाइन पोर्टल) सुरू केली आहे. येथे सर्वसाधारण लोक बजेटसंदर्भात आपल्या सूचना देऊ शकतात. हे 15 नोव्हेंबरपासून सर्वसामान्यांसाठी लाइव केले आहे. पोर्टल 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत खुले राहील. म्हणजेच 30 नोव्हेंबर रोजी सूचना सुचविण्याची शेवटची तारीख आहे.

– ही आहे लिंक- https://www.mygov.in/mygov-survey/inviting-suggestions-budget-2021-22/

सर्व इंडस्ट्रीकडून मत घेतले जाते :- उद्योग मंडळे, शेतकरी संघटना, विविध व्यवसायाशी संबंधित संघटना, कर्मचारी संघटना, राजकीय पक्ष इत्यादी सर्व अर्थमंत्र्यांसमोर आपला सल्ला देतात. अशा प्रकारे, सर्व पक्ष, पंतप्रधान, विविध मंत्रालये आणि मंत्रिमंडळाचा सल्ला घेत अर्थमंत्री वार्षिक अर्थसंकल्प तयार करतात.

 बजेट म्हणजे काय ते जाणून घ्या? :- अर्थसंकल्पात आर्थिक वर्षात किती पैसे खर्च केले जातात याचा लेखाजोखा आहे. सर्व ठिकाणी खर्च करण्यासाठी पैसे कुठून येतील हे देखील यात सांगण्यात आले आहे.विशेषतः मध्यमवर्गीय पगारी लोकांना बजेटची विशेष प्रतीक्षा असते, कारण त्यांना आयकरात सरकारकडून सवलत मिळण्याची अपेक्षा असते. सहसा वर्षाच्या 1 फेब्रुवारीला हे बजेट सादर केले जाते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reservedpp

Leave a Comment