अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी महत्वाची माहिती … ‘ह्या’ व्यक्तींना मंदिरात प्रवेश नाही !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :-  राज्य शासनाने घोषणा केल्याप्रमाणे जिल्ह्यातील धार्मिक स्थळे गेल्या तीन दिवसांपासून उघडली आहेत.मात्र, या मंदिरांमध्ये 65 वर्षांवरील व्यक्ती, गर्भवती महिला तसेच 10 वर्षाखालील मुलांना प्रवेश नाकारण्यात आला आहे.

तसेच दोन भक्तांमध्ये सहा फुटाचे अंतर राहील, असे दर्शन रांगेत नियोजन करण्याचा आदेशही जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिला आहे. मंदिरांबाबत जिल्हाधिकार्‍यांनी नियमावली जाहीर केली असून त्याचे पालन करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

अशी आहे नियमावली कमीत कमी सहा फुटाचे अंतर राखणे,

  • मास्क, सॉनिटायझरने वारंवार हात धुणे,
  • प्रवेशद्वारावर सॉनिटायझर, थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था,
  • आजाराची लक्षणे नसलेल्यांनाच प्रवेश,
  • मास्क असेल तरच मंदिरात प्रवेश,
  • प्रतिबंधात्मक उपायांवरील फलक लावणे,
  • जनजागृतीसाठी ऑडिओ, व्हीडिओ क्लीप लावणे,
  • पादत्राणे गाडीतच ठेवावीत, रांगांमध्ये शारीरिक अंतराच्या खुना आवश्यक,
  • हात-पाय साबणाने स्वच्छ धुणे बंधनकारक,
  • पुतळे, मूर्ती, ग्रंथांना स्पर्श करण्यास मनाई, गायन-भजन गटांना परवानगी नाही,
  • अन्नदान करताना नियमांचे पालन आवश्यक,
  • मंदिरातील कर्मचार्‍यांची कोविड चाचणी आवश्यक,
  • अंतरानुसार दर्शनासाठी दिवसाला संख्या निश्‍चत करणे यांचा समावेश आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment