राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय : शिवसेनेचे मंत्री भाजप नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी येणार …

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :-  राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे रविवार २२ नोव्हेंबर रोजी दुपारी भाजपचे नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी येणार असल्याने राजकिय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे .मंत्री सत्तार हे विखेंच्या घरी येणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय असून दोघांमध्ये काय राजकीय चर्चा होणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

राधाकृष्ण विखे पाटील व अब्दुल सत्तार हे काँग्रेसमध्ये असताना त्यांची मैत्री सर्वदूर परिचीत होती. दरम्यान राधाकृष्ण विखे यांनी काँग्रेसला रामराम करून भाजपात प्रवेश केला.

मात्र सत्तार यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केला. आता त्यांना महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये महसुल राज्यमंत्री म्हणून जबाबदारी दिली.

दरम्यान मंत्री सत्तार हे रविवारी नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून सकाळी ११.३० वाजता ते भाजप नेते तथा माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेणार आहे.या ठिकाणी ते १ तास थांबणार असून त्यानंतर पुढील कार्यक्रमास रवाना होणार आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment