अहमदनगर ब्रेकिंग ! दरोडेखोरांकडून ‘या’ टोलनाक्यावर दरोडा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात काही केल्या गुन्हेगारी कमी होताना दिसत नाही आहे. दरदिवशी यामध्ये वाढच झालेली पाहायला मिळते आहे.

यामुळे आता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दिवसेंदिवस वाढत आहे. यातच सोलापूर रोडवरील कॅन्टोन्मेंट टोलनाका येथे रात्री स्कॉर्पिओ व दुचाकीवरून आलेल्या दहा दरोडेखोरांनी टोल नाक्यावर धुमाकूळ घालून लुटला.

टोल नाका प्रमुख अजय सुगंध शिंदे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून व टोलनाका सुपरवायझर सचिन पवार यांना कोयत्याने मारहाण केली.

टोल नाक्याच्या गल्ल्यातील सुमारे ४६ हजार रुपये रोख रक्कम घेऊन पळून गेले आहेत. संदीप उर्फ म्हम्या शरद शिंदे (रा. बुरुडगाव रोड ,भागवत चाळ, ता. नगर), विक्रम गायकवाड व बाबा आढाव (दोघे रा. वाळुंज पारगाव ता. नगर),

संदीप वाकचौरे (रा. दरेवाडी ता. नगर), प्रकाश कांबळे (पूर्ण नाव नाही रा. कोंबडीवला मळा ता. नगर) इतर दोन अनोळखी इसम विरोधात भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment