कोरोनाचा धोका पाहता या ठिकाणची शाळा २ डिसेंबर पर्यंत बंद

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील शाळा तसेच कॉलेज बंद ठेवण्यात आले आहे. कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्यानं दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अनेक ठिकाणी शाळा अजूनही काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान सध्या जिल्ह्यात शाळा सुरू करण्याची लगबग सुरू आहे.

मात्र राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथील शाळा २ डिसेंबर पर्यंत बंद राहणार आहे. कोरोनाचा वाढता प्राद्रुर्भाव पहाता पिंपरी निर्मळ येथील ९ वी १० वी चे वर्ग २ डिसेंबर पर्यत बंद ठेवण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापन कमेटीने घेतला आहे.

दरम्यान नुकतंच शाळेतील एक शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह होता तर चार दिवसापुर्वी शाळेच्या मुख्यध्यापकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाची दहशत अद्यापही संपली नसल्याने नागरिकांमध्ये भीती कायम आहे. महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थेतील नववी ते बारावीचे वर्ग येत्या सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला.

मात्र, शाळा सुरू करताना स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरू कराव्यात. अशा सूचना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment