शेतकऱ्यांची काळजी या सरकारला नसेल तर गाठ आमच्याशी आहे – आशिष शेलार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :- पुणे पदवीधर मतदार संघातुन भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांच्या प्रचारार्थ शेलार पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. पब, बार उघडण्यापूर्वी मंदिरं उघडण्याची मागणी चुकीची नाही. नियम घालून ते जर उघडलं जाऊ शकतं. तर मंदिरं नियम घालून का उघडली गेली नाहीत. राज्यातील शाळा उघण्याच्या संदर्भात सरकारने आमच्याशी चर्चा करावी अशी आमची भूमिका आहे.

चर्चा केल्यानंतर भाजपची काय भूमिका आहे हे आम्ही जाहीर करू. मात्र करोनाची परिस्थिती पाहून स्थानिक प्रशासनानं निर्णय घ्यावा हा राज्य सरकारचा निर्णय चांगला आहे. भाजपशी आधी चर्चा करावी आणि मग शाळांच्या संदर्भात आंदोलन करायचं की नाही ते ठरवू. जर आमची सत्ता असती तर आम्ही सर्वांशी चर्चा करून निर्णय घेतला असता.

मात्र हे सरकार असे काही करताना दिसत नाही अस आशिष शेलार यांनी यावेळी सांगितले. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात महावितरणनं चांगल काम केले आहे.

वाढलेली थकबाकी ही शेतकऱ्यांना दिलेल्या थकबाकीची मुदत दिल्याने वाढली आहे. शेतकऱ्यांची काळजी या सरकारला नसेल तर गाठ आमच्याशी आहे. असा इशारा भाजपचे प्रवक्ते ,माजी मंत्री आशिष शेलार यांनी राज्य सरकारला दिलाय

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment