कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या गोवंशाच्या पाच जनावरांची पोलिसांकडून सुटका

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-संगमनेर शहरातील एका ठिकाणी बेकायदा कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या गोवंशाच्या पाच जनावरांची पोलिसांनी सुटका करण्यात आली.

शहर पोलिसांनी हि कारवाई केली आहे. तसेच 54 हजार रुपयांचा मुद्देमाल देखील पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, संगमनेर शहरातील मदिनानगर गल्ली मध्ये निसाल अहमद कुरेशी हा एका पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीररित्या गोवंश जनावरांची कत्तल करीत असल्याची माहिती, पोलीस पथकाला समजली.

दरम्यान या समजलेल्या माहितीच्या आधारे आज सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांच्यासह अमित महाजन, राजेंद्र डोंगरे, प्रमोद गाडेकर व सागर धुमाळ यांच्या पथकाने वरील ठिकाणी छापा टाकला.

या छाप्यात चार हजार रुपये किंमतीचे वीस किलो गोमांस व पन्नास हजार रुपये किंमतीचे तीन बैल व दोन गायी मिळून आल्या.

याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निसार अहमद कुरेशी याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस नाईक सलीम शेख करीत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment