संकट अद्याप टळलेले नाही… कोरोनाचा प्रादुर्भाव सुरूच

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा फैलावत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. गावपातळीवर कोरोनाचे संक्रमण वाढले असल्याने कोरोनाबाधितांची आकडेवारीत काहीशी वाढ होत आहे.

कोपरगाव शहरासह तालुक्यात गुरुवारी सापडलेल्या १० कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील १८२ व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली. त्यात १६, तर खासगी लॅबमधील ४ असे एकूण २० रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे.

१६६ व्यक्तींचे कोरोना अहवाल हे निगेटिव्ह आले. १६७ व्यक्तींचे नमुने नगर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली.

कोपरगाव शहर व तालुक्यात कोरोना विषाणूचे शुक्रवारी दिवसात एकूण २० व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आहे. त्यात शहरातील कोळगाव थडी येथील ७ रुग्ण, येसगाव येथील ३,

ब्राह्मणगाव येथील ३, मुर्शतपूर येथील ४, गोधेगाव येथील ३ असे २० रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. कोपरगाव तालुक्यात आज २० नोव्हेंबरपर्यंत एकूण दोन हजार २७१ रुग्ण पॉझिटिव्ह झालेले आहेत.

दोन हजार १८६ रुग्ण बरे झाले आहेत, तर आजपर्यंत एकूण १३ हजार ७४५ लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली. कोपरगावात कोरोना पॉझिटिव्ह होणाऱ्यांची १६.५२ टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण १.६२ टक्के असे आहे, तर ३७ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment