अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी तिघे ताब्यात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटना मध्ये वाढ होत आहे. तसेच यामुळे महिलांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे.

यातच कोपरगाव शहरात एका अल्पवयीन अल्पवयीन मुलीसह तिच्या बहिणीचा पाठलाग करून छेडछाड केल्याप्रकरणी पोलिसांनी चौघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

याबाबत विचारणा केली असता, आरोपींनी दगडफेक केली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मोद्या मंजूळ, सोन्या मंजूळ, गटर मंजूळ, विशाल गायकवाड (सर्व रा. दत्तनगर), अशी आरोपींची नावे आहेत.

शहरातील अल्पवयीन मुलगी बहिणीसह 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी बाहेर गेली असताना, आरोपींनी त्यांच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला.

एकीचा हात धरून ओढल्यामुळे घाबरलेल्या दोघी पळून गेल्या. आरोपींनी पाठलाग करीत दमदाटी केली. याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या लोकांवर दगडफेक केली. त्यात दोघे जखमी झाले.

पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, शहरातील दुसऱ्या घटनेतही एका मुलीचा विनयभंग करून मारहाण करण्यात आली. पोलिसांनी आरोपी नकुल ठाकरे (रा. कोपरगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment