व्वा रे पठ्या ! बिबट्यासोबत घेतला सेल्फी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-बिबट्याचे नाव जरी ऐकले तरी अनेकांना घाम फुटतो. आणि जर त्याला पहिले तर तोंडातून शब्द देखील फुटत नाही.

मात्र असाच एक बिबट्या जेव्हा खुद्द मानवी वस्तीवर शिकारीसाठी येतो, आणि आपण त्याला पहिले कि सर्वप्रथम त्याठिकाणाहून पळून जायचा विचार करतो.

मात्र एका पठ्याने चक्क या बिबट्यासोबतच सेल्फी घेतल्याची घटना जिल्ह्यात घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि,

राहुरी तालुक्यातील दवणगाव येथे शेतात मशागत करताना ट्रॅक्‍टरचालक वैभव कासार (रा. दवणगाव, ता. राहुरी) शेतकऱ्यास भरदिवसा बिबट्याचे दर्शन घडले.

शेतात भर दुपारी नांगरणी सुरू असताना तेथे बिबट्या आला. मात्र, वैभवने त्याच्या सहवासातच नांगरणी केली. तब्बल दीड एकर नांगरणी होईपर्यंत बिबट्या ट्रॅक्‍टरभोवती भक्ष्याच्या शोधार्थ फिरत राहिला.

ट्रॅक्‍टरवरून शेतकऱ्याने मोबाईलवर “सेल्फी’ घेतला. व्हिडिओ काढला. हे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

दरम्यान प्रवरा नदीकाठच्या आंबी, अंमळनेर, दवणगाव, केसापूर या गावांत बिबट्याची कायम दहशत आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वन खात्याने पिंजरा लावावा, अशी मागणी होत आहे. .

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment