महावितरणच्या महिला अधिकाऱ्यास मारहाण; या ठिकाणी घडली घटना

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :- सध्या वीजबिले व वसुली यावरून राज्यात वातावरण तापलेले आहे.

वीजबिले माफीसाठी नागरिक विनवणी करू लागले आहे, तर दुसरीकडे थकीत वीजबिले वसुलीसाठी महावितरण पुढे सरसावले आहे. यामुळे अनेकदा ग्राहक व महावितरणच्या कर्मचाऱ्यांमध्ये खटके उडालेले आहेत.

नुकतेच राहाता तालुक्यात वीज चोरीकरिता टाकलेले आकडे काढण्यास लावल्याचा राग आल्याने एकरुखे येथे वीज वितरण कंपनीच्या महिला अधिकार्‍यास धक्काबुक्की केल्याप्रकरणी तिघांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्यावरून गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी कनिष्ठ अभियंता मयुरी राजेंद्र घुगे (गणेशनगर, ता. राहाता) यांनी राहाता पोलिसांत फिर्याद दिली आहे. यात म्हंटले आहे कि,

शनिवार दि. 21 रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास मी व माझे सहकारी हे विद्युत संच मांडणीची पाहणी करत असताना एकरुखे येथील कचेश्वर लुटे यांच्या गायीचा गोठ्यात केबल टाकून अनधिकृतपणे विजेचा वापर सुरू असल्याचे दिसून आले.

त्या विजेचा वापर पिठाची गिरणी व दूध काढण्याच्या मशीनसाठी चालू असल्याचे आढळून आले असता मी व माझे सहकारी कर्मचारी यांना केबलचा आकडा काढण्यास सांगितले असता सतीश लुटे, शुभम लुटे,

संदीप लुटे यांनी मला शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. तुम्ही गावात कसे काम करता असे म्हणत धमकी दिली. तसेच आम्ही आमचे शासकीय काम करत असताना कामात अडथळा आणला. या तक्रारीवरून राहाता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment