EDच्या छापेमारीवरून महसूलमंत्री थोरात म्हणाले कि…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :- शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आज (२४ नोव्हेंबर) ईडीने छापा टाकला आहे.

छापेमारी केल्यानंतर ईडीच्या टीमने प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक यांना ताब्यात घेतलं आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया देताना भाजपवर निशाणा साधला आहे.

यावेळी पत्रकारांशी बोलतांना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले कि, ‘केंद्रीय संस्थांचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जातोय. आम्ही कायम यावर आक्षेप घेतला आहे.

भाजपचं सरकार जिथे आहे, तिथे छापेमारी झाल्याचे गेल्या सहा वर्षात दिसले नाही. ईडीसारख्या संस्थांचा राजकारणासाठी वापर केला जातोय हे दुर्दैवी आहे.

‘ ‘भाजपचं ऑपरेशन कमळ यशस्वी होईल, असे वाटत नाही. ईडीच्या छापेमारीमुळे कोणावरही दबाव येणार नाही. उलट लोक पक्के होतील.

महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष एकत्र आहेत दरम्यान,शिवेसना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) छापा टाकला आहे.

प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीचे पथक पोहोचले आहे. यानंतर विहंग सरनाईक यांना ईडीने ताब्यात घेतले आहे.

दरम्यान प्रताप सरनाईक सध्या देशाबाहेर आहेत. महत्त्वाचं म्हणजे सरनाईक यांच्याव्यतिरिक्त शिवसेनेचे आणखी काही नेते ईडीच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment