पहिल्या दिवशी हजाराहून अधिक विद्यार्थ्यांची शाळांमध्ये उपस्थिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 18 मार्चपासून राज्य शासनाने शाळा बंद केल्या होत्या. त्यानंतर अनलॉक प्रक्रियेस सुरुवात झाल्यांनतर कालपासून (दि.23) शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.

पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची शाळांमध्ये अल्प उपस्थिती असल्याची पाहायला मिळाली होती. नेवासे तालुक्यातील ८३ पैकी ६६ शाळांमध्ये सोमवारी १०८५ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.

अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातून येत असतात. त्यांना वाहने उपलब्ध झाली नाहीत. काही विद्यार्थी सायकलीवर आले होते. शाळा सुरू होण्याआठी ५५५ शिक्षकांची कोरोना टेस्ट घेण्यात आली. त्यात एकजण पॉझिटिव्ह निघाला. तालुक्यातील ८३ शाळांमध्ये नववी ते बारावीचे वर्ग आहेत. त्यापैकी ६६ शाळा चालू झाल्या.

एकूण विद्यार्थी संख्या २१ हजार ४०८ असून त्यापैकी १०८५ विद्यार्थी उपस्थित होते. या विद्यार्थ्यांच्या चाळीस मिनिटांच्या चार तासिका सलग घेण्यात आल्या. तालुका वैद्यकीय अधिकारी अभिराज सूर्यवंशी व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शाळांना भेट देऊन आरोग्य सुविधेची पाहणी केली. हे मिशन आम्ही यशस्वी करू, असे गट शिक्षणाधिकारी सुलोचना पटारे यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment