या तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या पाच हजारांच्या जवळपास

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला आहे. दरदिवशी रुग्णसंख्येचा आकडा घटत आहे. तर कोरोनामुक्तांचा आकडा देखील वाढत आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून परिस्थिती बदलते आहे.

एकीकडे कमी होणारे आकडेवारी दिवाळीनंतर पुन्हा वाढत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी दर चांगला असला तरी नागरिकांचा बेजाबदारपणा कोरोनाची आकडेवारी वाढविण्यास कारणीभूत ठरणार आहे. संगमनेर तालुक्यात सोमवारी 32 करोनाबाधित आढळून आले आहेत.

शहरातील दोन तर ग्रामीण भागातून 30 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तालुक्याची एकूण बाधितांची संख्या 4 हजार 954 इतकी झाली आहे. संगमनेर शहरासह तालुक्यात कोरोना पुन्हा एकदा सक्रिय होत आहे.

संगमनेर तालुक्याचे बरे होण्याचे प्रमाण समाधानकारक असले, तरी वाढत्या रुग्णसंख्येने पालक वर्गात धास्तीचे वातावरण आहे. दरम्यान, प्रशासनाची धावपळ वाढली असून लस उपलब्ध होईपर्यंत नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन केले जात आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment