शहरात चोरट्यांचा धुमाकूळ; घरात घुसून 50 हजार चोरले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात लुटमारी, चोरी, दरोडा, घातपात अशा गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. संपूर्ण जिल्ह्यात चोरटयांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.

वाढत्या चोरीच्या घटनांमुळे मात्र नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे. त्यातच नगर शहरात होणाऱ्या चोऱ्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

नुकतेच शहरातील एका घराच्या खिडकीचे ग्रिल उचकाटून चोरट्यांनी घरामधील 40 हजार रूपयांची रोकड व 10 हजार रूपये किंमतीचे चांदीचे ग्लास असा 50 हजार रूपयांचा ऐवज लंपास केला.

गुलमोहर रोडवरील स्वामी समर्थ मंदीराजवळ ही चोरीची घटना घडली. तोफखाना पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामकिसन लादुराम खंडेलवाल (वय- 60 रा. गुलमोहर रोड, नगर) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांच्या घराच्या खिडकीचे ग्रिल उचकाटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. रोख रक्कम, चांदीचे ग्लास चोरून चोरट्यांनी धूम ठोकली. पुढील तपास पोलीस नाईक मंगेश खरमाळे करीत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment