भिंगार शहराचा पाणीपुरवठा पुन्हा झाला विस्कळीत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :- मागील काही महिन्यापासून मुळाधरण ते एमआयडीसी या दरम्यान जलवाहिनी फुटत आहे. ही जलवाहिनी जुनी झाल्याने वारंवार ही घटना घडत आहे. त्यामुळे भिंगार शहराचा पाणी पुरवठा पुन्हा विस्कळीत झाला आहे.

बुधवारी (दि.25) पुन्हा एमआयडीसीची जलवाहिनी फुटल्याने छावणी परिषदेला पाणी मिळू शकले नाही. ती दुरुस्ती झाल्यावर पाणी मिळणार आहे, असे छावणी परिषदेकडून सांगण्यात आले.

नवीन जलवाहिनीचे काम सुरू करण्यात आल्याचे समजते. परंतु ते काम कधी पूर्ण होईल याची माहिती दिली जात नाही. मुळा धरणातून छावणी परिषदेला थेट पाणी पुरवठा होत नाही.

एमआयडीसीकडुन लष्कराच्या एम ई एस पाणीपुरवठा विभागाला व त्यांच्याकडून छावणी परिषदेला पाणीपुरवठा होत आहे. त्यातही रोज तीन लाख गॅलनची आवश्यकता असतांनाच दिवसाआड ते मिळते.

पण विद्युतपुरवठा खंडित झाला अथवा जलवाहिनी फुटली तर छावणी परिषदेला पाणी मिळत नाही. जनतेने सहकार्य करावे असे आवाहन छावणी परिषदेने केले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment