सामाजिक कार्यकर्ते मकासरे यांना जामीन मंजूर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी राहुरी येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ.विजय मकासरे यांच्यावर काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या दाखल केलेल्या गुन्ह्यात त्यांना अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात नुकताच अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, डॉ.विजय मकासरे यांनी गुटखा तस्करी प्रकरणी श्रीरामपूरचे तत्कालिन पोलीस निरीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याविरुद्ध नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे तक्रार केली होती.

त्यावरुन गुटखा प्रकरणाचा तपास शिर्डीच्या उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांककडे सोपविला. त्यानंतर श्रीरामपूर पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍याने राहुरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन मकासरे यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात याची सुनावणी होऊन वास्तविक पाहता सदर गुन्ह्यामध्ये पोलिसांनी डॉ.विजय मकासरे यांच्यावर आरोप केलेले आरोप हे कल्पनाशक्तीच्या बाहेरचे आहेत असल्याचे निरीक्षण नोंदविले.

शासकीय कामात अडथळा आणण्यासारखे कोणतेही काम डॉ.मकासरे यांनी केलेलं नाही असे दाखल पुराव्यावरून न्यायालयाच्या निदर्शास आले. त्यावरुन मकासरे यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. मकासरे यांच्या वतीने अ‍ॅड. बी. बी. पालवे यांनी कामकाज पहिले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment