अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :- अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला आहे. या अपघातात काशिनाथ शिवमुर्ती मांदळी (वय वर्ष ५०, रा. बोधेगाव ता. शेवगाव) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, नगर पुणे रोड वरील कामरगाव तालुका नगर शिवरात हॉटेल शांभवी समोर हा अपघात झाला. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजी देवराव ढवाण राहणार बोधेगाव तालुका शेवगाव यांनी फिर्याद दिली आहे. घडलेली घटना अशी कि, मयत काशिनाथ मांदळे ही फिर्यादी यांच्यासह नगर पुणे रोड वरून जात असताना कामरगाव शिवारात हॉटेलवर थांबले .

हॉटेलमधून बाहेर निघाल्यानंतर रस्ता ओलांडून परत येत असताना काशिनाथ यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत काशिनाथ यांचा मृत्यू झाला याप्रकरणी पुढील तपास पोलिस नाईक शिंदे करीत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment