कांद्याचे दर दिवाळीनंतर घसरल्याने शेतकरी वर्गातून नाराजी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :-दोन महिन्यांपूर्वी तेजीत आलेल्या कांद्याच्या दरात दोन आठवड्यात मोठी घसरण सुरू आहे. वांबोरी उपबाजारात शनिवारी एक नंबर कांदा २८०० ते तीन हजार पाचशे रुपयांनी विकला गेला.

कांद्याचे दर दिवाळीनंतर घसरल्याने शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. नगर जिल्हा हे कांद्याचे मोठे आगार म्हणून ओळखले जाते. यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले.

महिनाभर कांद्याचे दर सहा ते सात हजारापर्यंत तेजीत होते. परंतु दिवाळीनंतर कांद्याच्या दरात पुन्हा घसरण सुरू झाली. शनिवारी वांबोरी उपबाजारात एक नंबर कांदा साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटल दराने विकला गेला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment