धक्कादायक : मृताच्या नावावरील जमीनीची परस्पर केली विक्री !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :-श्रीगोंदे तालुक्यातील सारोळा सोमवंशी येथील तीन एकर जमीन शेतमालक मयत असताना बनावट इसम उभे करून साडे चार एकर विक्री करण्याचा प्रकार घडला.

याबाबत श्रीगोंदे पोलिसात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शबनम जाकीरहुसेन उल्डे,पुणे यांनी श्रीगोंदे पोलिसात फिर्याद दिली आहे.

जाकीर हुसेनअली उल्डे यांचे नावावर सारोळा सोमवशी येथे शेत जमीन गट नंबर ४२ मध्ये १ हेक्टर ८४ गुंठे जमीन आहे. जाकीर हुसेनअली उलडे हे १ मार्च २००६ रोजी मृत झाले आहेत.

कोरोना काळात फिर्यादी यांना शेतीकडे येता आले नाही. जमीन ही पडीक होती. त्यांनी शैक्षणिक कामासाठी फिर्यादीने शेतजमिनीचा सातबारा उतारा काढला असता

उतारा पाहता पती जाकीर हुसेनअली यांचे नाव कमी होवुन ते विशाल नामदेव सुपेकर राजनकवाडी किलबील हायस्कुल पुणे यांचे नावावर झाले असल्याचे दिसले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment