वादग्रस्त पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांची तडकाफडकी बदली

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-सतत वादग्रस्त राहिलेले व ऐन दिवाळीच्या दिवशी आपल्याच सरकारी वाहनाच्या चालकाच्या मुखातून अवघ्या राज्यात चर्चेचा विषय ठरलेले अकोल्याचे वादग्रस्त पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांची अखेर नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.

त्यांच्या जागी संगमनेरातून नियंत्रण कक्षात पोहोचलेले पेालीस निरीक्षक अभय परमार यांच्या हाती अकोल्याची सूत्रे सोपविण्यात आली आहे. नवीन पोलीस निरीक्षक परमार यांच्या पुढे पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचार्‍यांची अंतर्गत गटबाजी, अवैध व्यवसाय थांबविण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

संगमनेरातील अनुभव लक्षात घेता अकोल्यातील अशा घटनांचा तपास लावण्याचे मोठे आव्हानही पोलीस निरीक्षक परमार यांच्यासमोर असणार आहे. कोणालाही अंगावर घेण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीमुळे ते यात यशस्वी होतील असा अकोलेकरांना विश्वास आहे.

दरम्यान अकोले पोलिस ठाण्यात गेली 15 महिने पोलीस निरीक्षक म्हणून काम केलेले अरविंद जोंधळे यांची कारकिर्द काही काळ चांगली गेली मात्र अलिकडच्या काळात ते वादग्रस्त ठरले. पोलीस ठाण्या अंतर्गत गटबाजी उफाळून आली. पोलिस अधिक्षकांनी दिवाळी पूर्वी अकोले पोलिस ठाण्यातील तीन पोलिस हवालदारांना निलंबित केले.

यानंतर दिवाळीच्या काळातच या निलंबित हवालदारापैकी चालक म्हणून काम पाहणार्‍या एका कर्मचार्‍याने सोशल मिडीयाच्या माध्यमातून एक ऑडिओ संभाषण क्लिप व्हायरल केली. विषेश म्हणजे वर्षभरापूर्वी रेकॉर्ड केलेले फोन एकत्रित करून आपल्या वर कारवाईचा बडगा उगारणार्‍या पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी अकोलेचे निरीक्षक अरविंद जोधळे यांच्या बदलीचे आदेश दिले. अकोले पोलिस ठाण्यात प्रभारी म्हणून संगमनेर शहर पोलिस ठाण्यात काम पाहिलेले पोलिस निरीक्षक अभय परमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment