कार्यकर्त्यांना त्रास देण्याचे प्रकार सहन केले जाणार नाही – आमदार शिवाजी कर्डिले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-राहुरी येथील तांदूळवाडी येथे शेतकऱ्यांना ४५ लाखांच्या कर्जाचे वितरण करताना माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी शनिवारी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा नामोल्लेख न करता जोरदार टीका केली.

कर्डिले म्हणाले, माझ्या आमदारकीच्या काळातील मंजूर कामांचे आणखी दोन वर्षे उद्घाटने केली, तरी पूर्ण होणार नाही इतकी कामे झाली. सत्तेचा वापर करून कार्यकर्त्यांना त्रास देण्याचे प्रकार सहन केले जाणार नाही.

एक वर्ष झाले तरी अजून कामे होत नाहीत. विजेचे डीपी वेळेवर मिळत नाहीत. कामे करताना मी कधीच गट-तटाचा विचार करत नाही. पत्रकार शिवाजी घाडगे, महेश खाटेकर, साहेबराव तोडमल आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला.

अध्यक्षस्थानी शिवाजी खाटेकर होते. यावेळी विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्टचे माजी अध्यक्ष उत्तमराव म्हसे, भाजप तालुकाध्यक्ष अमोल भनगडे, युवक तालुकाध्यक्ष रवीं‌द्र म्हसे, कृषी उत्पन्न बाजार समिती व पंचायत समितीचे सदस्य सुरेश बानकर,

नगरसेवक शहाजी जाधव, किशोर वने, अनिल आढाव, जिल्हा बँकेचे अधिकारी तनपुरे, जालिंदर खडके, उपसरपंच इंद्रभान पेरणे, रामराव पेरणे आदी उपस्थित होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment