घर साफसफाईसाठी आलेल्या महिलेने सोन्याचे गंठण केलं लंपास

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. घराच्याबाहेर पडले तरीही चोरट्यांकडून लुटण्याची भीती आहे. मात्र आता घरबसल्या देखील चोरीच्या घटना घडू लागल्या आहेत.

घर कामासाठी आलेल्या महिलेने दोन तोळ्याचे गंठण चोरून नेल्याची फिर्याद कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. पोलिसांनी प्रतिभा अवसरकर (रा. नानाजीनगर, नगर) हिच्याविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

या चोरीच्या घटनेबाबत निर्मला पन्नलाल कोठारी (रा. माळीवाडा, नगर) यांनी फिर्याद दिली आहे. कोठारी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, प्रतिभा अवसरकर हि घर कामासाठी आमच्या घरी आली असता

दुपारी दीड ते अडीच वाजेच्या दरम्यान तीने घरातील काम करताना दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण चोरून नेले आहे. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास महिला पोलीस नाईक कविता गडाख करीत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment