पत्नीला औषध विषारी पाजून ठार मारण्याचा प्रयत्न

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2020 :- घरवाली  बाहरवालीच्या नादातून आजवर अनेक खळबळजनक प्रकार घडले आहे. एकीसाठी दुसरीचा काटा काढण्याचा धक्कादायक प्रकार याआधीही तुम्ही ऐकले असतील, असाच काहीसा प्रकार नगर जिल्ह्यात घडला आहे.

प्रेम करण्यात अडसर ठरते म्हणून पत्नीला विषारी औषध पाजून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे आरोपावरून सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

या गुन्ह्यातील आरोपी पतीला 3 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी मंगल अनिल खरात (वय वर्ष 25 रा.भेंडा, ता.नेवासा) हल्ली मुक्काम वांजोळी तालुका नेवासा

हिने सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीने म्हंटले आहे कि,29 नोव्हेंबर रोजी सकाळी आरोपी अनिल पोपटराव थोरात (रा.वांजोळी शिवार)

यांनी फिर्यादी पत्नी मंगल खरात हिला प्रेमप्रकरणात अडसर होत असल्याने जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment