पदवीधर निवडणूक! मतदानासाठी या ओळखपत्रांचा पुरावा जवळ बाळगू शकता

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 1 डिसेंबर 2020 :-पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणूक प्रचाराची रविवारी सांगता झाली. या निवडणुकीसाठी 1 डिसेंबर 2020 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान कोरोनाच्या काळात होणारी ही राज्यातील पहिली निवडणूक आहे.

पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता मतदान करताना मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करु शकत नाहीत,

अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या (EPIC) व्यतिरिक्त अन्य पर्यायांचा देखील वापर करता येणार आहे. जाणून घ्या मतदानासाठी कोणकोणता पुरावा ग्राह्य धरला जाणार आहे..

  • 1) आधार कार्ड
  • 2) वाहन चालक परवाना
  • 3) पॅन कार्ड 4) पारपत्र
  • 5) केंद्र/राज्य शासन / सार्वजनिक उपक्रम/स्थानिक स्वराज संस्था किंवा खाजगी औद्योगिक घराणे यांनी वितरीत केलेले सेवा ओळखपत्र
  • 6) खासदार/आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र
  • 7) संबंधित पदवीधर/शिक्षक मतदार संघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या पदवीधर/शिक्षक मतदारांना वितरीत केलेले सेवा ओळखपत्र
  • 8) विद्यापीठाद्वारे वितरित पदवी/पदवीका मुळ प्रमाणपत्र
  • 9) सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरीत केलेले अपंगत्वाचे मुळ प्रमाणपत्र

इत्यादी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याबाबत निवडणूक आयोगाने आदेशित केले आहे. छायाचित्रासह मतदार ओळखपत्रान्वये मतदाराची ओळख पटत असेल तर मतदार ओळखपत्रातील किरकोळ विसंगती दुर्लक्षित करण्यात याव्यात.

तसेच छायाचित्रासह मतदार ओळखपत्रातील विसंगत छायाचित्रामुळे मतदाराची ओळख पटणे/पटविणे शक्य नसल्यास मतदारास उपरोक्त पर्यायी कागदपत्रांपैकी एक ओळख कागदपत्र सादर करणे आवश्यक राहील.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment