कोरोना काळात गरिबांना आमदार जगताप यांनी दिला आधार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 1 डिसेंबर 2020 :-कोरोना विषाणू रोखण्यासाठी शासनाने केलेल्या टाळेबंदीच्या काळात गोरगरीब व गरजूंना युवा आमदार संग्राम जगताप यांनी भरीव मदत केली.

अन्नधान्य व किराणा मालाचे वाटप केले, ही बाब कौतुकास्पद असल्याचा उल्लेख राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ अजित पवार यांनी केला.

पार्थ पवार अहमदनगर येथे आले असता त्यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी पार्थ पवार बोलत होते.

यावेळी पार्थ पवार यांचा सत्कार आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राजू बापू शेलार, अंकुश चत्तर, प्रसन्ना बीडकर आदी उपस्थित होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment