रुग्णाच्या घरावर पाेस्टर लावणे अस्पृश्यांसारखे’ !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2020 :-कोरोना रुग्णाच्या घरावर तो बाधित असल्याचे पोस्टर लावल्याने त्याला अस्पृश्यांसारखी वागणूक दिली जाते, हे एक भीषण वास्तव असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी व्यक्त केले.

कोरोना दिशानिर्देशांबाबत दाखल याचिकेवर सुनावणीत कोर्टाने ही टिप्पणी केली. केंद्राच्या वकिलांना कोर्ट म्हणाले, दिल्ली सरकार रुग्णांच्या घरी फलक न लावण्यास तयार झाले आहे.

असेच निर्देश केंद्र सरकार पूर्ण देशासाठी का देऊ शकत नाही? केंद्राच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की, संसर्ग रोखण्यासाठी काही राज्यांनी फलक लावले. यातून इतर जागृत होतील. मात्र, केंद्राने असा कोणताही नियम लागू केलेला नाही.’

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment