अल्पवयीन मुलीस पळविणाऱ्या तरुणास पोलिसांनी केले गजाआड

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :-गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात अल्पवयीन मुलींना पळवून घेऊन जाण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे पालकवर्गांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नुकताच असाच काहीसा प्रकार संगमनेर मध्ये घडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून घेऊन जाणाऱ्या तरुणाला संगमनेर येथील पोलिसांनी नगर शहरातील माळीवाडा बस स्थानकावर अटक केली आहे.

निलेश श्रावण राठोड (वय-२५ रा. संगमनेर) अशी अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. अल्पवयीन मुलीसह राठोड याला पुढील तपास कामी संगमनेर शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राठोड व पीडित मुलगी कामधंद्यासाठी पुणे येथे जात असल्याची माहिती अधिक मानवी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने तात्काळ आरोपी राठोड यास माळीवाडा बस स्थानक येथे अटक केली तर अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment