सात लाखांची दूध भुकटी चोरीस; या ठिकाणी घडली घटना

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस उंचावतच आहे. चोरी, लुटमारी अशा घटनांना आळा घालण्यात अद्यापही पोलिसांना यश येत नसल्याचेच या घटनांमधून दिसून येत आहे.

नुकतीच अशीच एक चोरीची घटना नेवासा तालुक्यात घडली आहे. नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील शेटे यांचे पेट्रोल पंप आवारात उभ्या केलेल्या मालट्रक मधून 7 लाखांच्या दूध भुकटी गोण्यांची चोरी झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, घोडेगाव येथील साई बॅटरीचे दुकानदार सोहेल भैय्या शेख (वय 22) याने सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की,

घोडेगाव येथील एकनाथ शेटे यांचे पेट्रोल पंपासमोर आवारात उभ्या केलेल्या मालवाहतूक ट्रक (एमएच 16 सीसी 7451) मधून अज्ञात चोरट्यांनी ट्रकची

मागील ताडपत्री कापून 7 लाख 10 हजार 548 रुपये किंमतीच्या दूध पावडरच्या 148 गोण्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत.

या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र करपे व सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात करत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment