शेतात, घरात साप निघाला ? पकडू नका अन्यथा होईल 7 वर्षांची शिक्षा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-केरळमध्ये आता साप पकडण्यासाठी लायसन्स अनिवार्य करण्यात आले आहे. केरळच्या वन व वन्यजीव विभागाकडून प्रशिक्षण व लायसन्स न घेता साप पकडल्यास तुरुंगवास व सात वर्षांपर्यंत दंड होऊ शकतो.

केरळमध्ये आता साप पकडण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. देशात हा पहिलाच प्रयोग आहे. एका साप पकडणाऱ्याचा मृत्यू, कोब्रा सापाचा वापर करून महिलेचा खून आणि शाळेत साप चावल्याने मुलाचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्यानंतर वनविभागाने हे पाऊल उचलले आहे.

प्रशिक्षण दोन टप्प्यात पूर्ण केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात वनविभागाच्या कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले होते ज्यात वाॅचर ते एसीएफ रँक पर्यंतचे कर्मचारी समाविष्ट होते. दुसर्‍या टप्प्यात साप पकडण्यात रस असणार्‍या लोकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

पहिल्या टप्प्यात या प्रशिक्षणात 538 लोक उपस्थित होते, त्यापैकी 318 लोकांना लायसन्स दिले गेले. दुसर्‍या टप्प्यात 620 लोक प्रशिक्षणात सामील झाले आणि 502 लोकांना लायसन्स दिले गेले . परवाना मिळालेल्यांपैकी 35 महिला देखील आहेत. यात वनविभागाचे 23 कर्मचारी असून 12 सामान्य लोक आहेत.

राज्यभरात 23 ठिकाणी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. नोडल अधिकारी आणि प्रशिक्षण कार्यक्रमाचे सहाय्यक संरक्षक (एसीएफ) मोहम्मद अन्वर म्हणाले की, “हा फक्त एक प्रशिक्षण कार्यक्रम नसून सर्पदंश थांबविण्याचा प्रकल्प आहे, जो आमच्या विभागाने सुरू केला आहे.

ज्यांना परवाना मिळाला आहे त्यांची यादी आम्ही तयार करू आणि आमच्या मोबाइल अ‍ॅप ‘सर्प’ च्या माध्यमातून लोक सापांना पकडण्यासाठी त्यांची सेवा घेऊ शकतील. आपत्कालीन परिस्थितीत, अॅप जवळच्या हॉस्पिटल आणि सर्प कॅचरबद्दल माहिती देईल.

या अ‍ॅपमध्ये सापांच्या चाव्यासाठी दिली जाणारी औषधे उपलब्ध असलेल्या रुग्णालयांची यादी देखील असेल. आता केंद्र सरकारचे पर्यावरण विभाग हा प्रयोग इतर राज्यातही राबविण्याच्या विचारात आहे. दरम्यान, केरळमधील प्रसिद्ध स्नेक हँडलर बाबा सुरेश यांनी साप पकडण्यासाठी परवाना घेण्याची आवश्यकता असल्याचा विरोध केला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment