आमदार राधाकृष्ण विखे यांच्या प्रयत्नांमुळे ६ कोटींचा निधी उपलब्ध

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :- लोणी खुर्दमधून जाणाऱ्या नांदूर शिंगोटे ते कोल्हार रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी आमदार राधाकृष्ण विखे यांच्या प्रयत्नांमुळे ६ कोटींचा निधी उपलब्ध झाला असून काम वेगाने सुरू झाले आहे.

दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या रस्त्याचे काम फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करा, अशा सूचना विखे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

स्थानिक पदाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत लोणी खुर्द येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी करून विखे यांनी काही सूचना केल्या.

रस्त्याच्या रूंदीकरणासह कारपेट, दुभाजक, पथदिवे, साईडपट्ट्या आणि मोरीच्या कामासह रोड फर्निचर आणि थर्मोप्लास्टिक पेंटच्या बाबीचा समावेश या कामात करण्यात आला आहे.

रस्ता रूंदीकरणाबरोबरच महावितरण, तसेच भारत संचार निगमचे सहकार्य घेऊन खांब आणि टेलिफोन डीपी हलवण्याच्या कामाला प्राधान्य देण्याची सूचना विखे यांनी केली.

आडगावफाटा, बाजार समिती उपकेंद्र, वेताळबाबा चौक, लोणी पोलिस ठाणे येथे सर्कल टाकण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या मार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे लोणी खुर्द येथील वाहतुकीची कोंडी कमी झाली.

नांदूर शिंगोटेपर्यंत हा मार्ग जोडला गेला असल्याने नाशिककडे जाणाऱ्या वाहतुकीलाही मोठी मदत होणार असल्याचे आमदार विखे म्हणाले.

Leave a Comment