आयपीएल २०२१ मध्ये संघांची संख्या वाढणार ? वाचा काय म्हणाले बीसीसीआय..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :-आयपीएलच्या स्पर्धेत २०२१ मध्ये होणाऱ्या हंगामात संघांची संख्या वाढणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या परंतु या चर्चांणा बीसीसीआयने पुर्णविराम दिला आहे.

मार्च २०२१ मध्ये होणाऱ्या आयपीएल स्पर्धेत संघ्यांच्या संख्येत वाढ होणे कठीण असल्याचे मत व्यक्त केले आहे. आयपीएलचा पुढींल हंगामासाठी अवघ्या ४ महिन्यांचा कालावधी उरला आहे.

या कालावधीत नव्या संघांचा लिलाव, सामना खेळवण्यात येणाऱ्या ठिाकण तसेच कोरोनाची परिस्थिती जैसे थे असल्यास आयपीएल सामने कुठे खेळवण्यात येणार याचे नियोजनही करण्यासाठी वेळ अपुरा असल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे.

त्यामुळेच आयपीएल संघांच्या संख्येत वाढ करणे शक्य नसल्याचे बीसीसीआयने सांगितले आहे. यंदा आयपीएलचे आयोजन दुबईमध्ये करण्यात आले होते. तेव्हाच बीसीसीआयने पुढील हंगाम हा भारतात होणार असल्याची घोषणा केली होती.

परंतु भारतात कोरोना परिस्थिती आटोक्यात असली तरी आयपीएलच्या हंगामात नव्या संघांना परवानगी देण्याची शक्यता कमी असल्याचे बीसीसीआयने सांगितले आहे.

भारतात आयपीएल सामने खेळवण्यासाठी बीसीसीआयला सामन्यांसाठी आयोजन करावे लागेल. तसेच या स्पर्धांसाठी केंद्रे तयार करावी लागणार आहे. खेळाडूंसाठी बायोबबल सुरक्षेचे आयोजनही करावे लागणार आहे. सामन्यांच्या आयोजनासाठी संबंधित घटकांची परवानगी मिळवणे हे मोठे आव्हान असल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे.

Leave a Comment