खुशखबर! पदवीधर मुलींना मिळणार प्रत्येकी 50 हजार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात बिहार निवडणूक पार पडली होती. या निवडणूक दरम्यान अनेक पक्षांकडून भरभरून घोषणांचा पाऊस पाडण्यात आला होता. अशीच एक घोषणा नितीशकुमार यांनी देखील केली होती.

मात्र दिलेल्या शब्दाला जागत बिहार सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत जदयुचे नेते नितीशकुमार यांनी आपण पुन्हा सत्तेत आल्यास राज्यातील पदवीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींना प्रत्येकी 50 हजार रुपये देण्याची घोषणा केली होती.

आता दिलेल्या आश्वासनाला जागत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लवकरच मोठी घोषणा करण्याची तयारी केल्याचे समजते. मुख्यमंत्री पदवीधर विद्यार्थिनी या योजनेतील यंदाच्या वाढीव मदतीमुळे याचा राज्यातील जवळपास 1.50 लाख विद्यार्थिंनींना फायदा होणार आहे. याआधी पदवीधर विद्यार्थिंनीना 25 हजाराच्या मदतीची तरतूद होती.

दरम्यान या योजनेमध्ये बदल करण्यात आला असून आता मुख्यमंत्री पदवीधर विद्यार्थिनी प्रोत्साहन योजनेअंतर्गत राज्यातील लाभार्थी मुलींच्या बँक खात्यात प्रत्येकी 50 हजार रुपये जमा करण्यासाठीचा प्रस्ताव बिहारच्या शिक्षण विभागाने तयार केला आहे. लवकरच हा प्रस्ताव अर्थ विभागाकडे पाठवला जाणार आहे.

त्यानंतर कॅबिनेटची मंजुरी घेतली जाईल. विशेष म्हणजे, यावेळी मागच्या वेळेपेक्षा 100 कोटींहून अधिक रक्कम यावेळी दिली जाणार आहे. 2019-20 या वर्षात या योजनेसाठी शिक्षण विभागाकडून 200 कोटीची रुपयांची तरतूद केली होती. यावेळी 2021 या वर्षात त्यात 100 कोटीची वाढ करून एकूण 300 कोटींची तरतूद केली जाणार आहे.

Leave a Comment