वातावरण बदलामुळे शेतकऱ्यांना’बुरे दिन ‘

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :- विविध भागांत आठवडाभरापासून होत असलेल्या वातावरणातील बदलामुळे शेतीतील उभ्या पिकावर विविध रोगांचा प्रदुर्भाव होत आहे.

त्यामुळे शेतकरी चिंतातूर असून, शेतातील पीक वाचविण्यासाठी अनेक प्रकारच्या महागड्या औषधाची फवारणी करीत पिके वाचिवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

त्यामुळे वातावरणातील बदल शेतकऱ्यांच्या मुळावर उठले असून सध्या शेतकऱ्यांना बुरे दिन आल्याचे म्हणावे लागेल. या वर्षी परतीच्या पावसासह अवकाळी पावसाने प्रचंड धुमाकूळ घातल्याने खरिपाचे नुकसान झाले.

काही शेतकऱ्यांनी कांद्यासह इतर पिकांची लागवड केली होती. ती अवकाळी पाऊस उघडल्यानंतर बऱ्यापैकी होती. शेतकऱ्यांनी पाऊस उघडल्यानंतर औषधाची फवारणी करून कांदा पिकात सुधारणा झाली होती.

आता ढगाळ वातावरणामुळे पिके पिवळी पडण्याबरोबरच त्यांच्यावर करपा व मावा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

एकीकडे वातवरणातील बदलाने शेतकरी मेटाकुटीला आलेला असताना परत बाजारातील चढउताराने त्याला अधिक संकटात टाकले आहे.

अवघ्या आठवडाभरात कांद्याचे दर अवघ्या २४०० रूपयांवर आले असून यामुळे आता काय करावे असा प्रश्न उपस्थित होत आहे.आधिच उत्पन्न कमी खर्च अधिक व आता दर कोसळल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.

Leave a Comment