शहरातील सर्व हॉस्पिटलमध्ये निर्णय व हॉस्पिटलचे दरपत्रक दर्शनी भागात लावण्याची मागणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- सर्वोच्च न्यायालयाने नुकताच सर्वसामान्यांना वाजवी किंमतीत वैद्यकिय उपचार मिळण्याचा अधिकार मुलभूत अधिकाराचा अविभाज्य घटक असल्याचा निवाडा दिला आहे.

या निर्णयाचे पिपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने स्वागत करण्यात आले.

तर शहरातील सर्व हॉस्पिटलमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या वैद्यकिय उपचार मिळण्याचा अधिकार मुलभूत अधिकाराचा अविभाज्य घटक असल्याच्या निर्णय व हॉस्पिटलचे दरपत्रक दर्शनी भागात लावण्याची मागणी तसेच रुग्णपिपासू ओळखा आणि सर्वांना कळवाची घोषणा करण्यात आली आहे.

भारतीय घटनेच्या कलम 21 खाली जीविताचा आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने एका वर्तमानपत्राच्या बातमीची दखल घेऊन त्याचे जनहित याचिकेत रुपांतर करुन दिलेल्या निर्णयाने गोर-गरिब रुग्णांना वाजवी किंमतीत आरोग्याचा अधिकार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती अशोक भूषण, आर.सुभाष रेड्डी व एम.आर. शहा यांच्या खंडपिठाने हा निर्णय दिला आहे. वर्षानुवर्षे सर्वसामान्यांची हॉस्पिटलमध्ये परवड झाली आहे. कोरोना महामारीच्या संकटकाळात अनेक हॉस्पिटलने आर्थिक लूट करुन रुग्णांचे शोषण केल्याचे अनेक प्रकरणातून उघड झाले.

या शोषणाची दाद मागण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा असतित्वात असला तरी वेळ, पैसा जाण्याच्या भितीने कोणी दाद मागण्यास तयार होत नाही. अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य रुग्णांची लूटमार होत आहे.

नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी रुग्णपिपासू ओळखा आणि सर्वांना कळवाची घोषणा संघटनेच्या वतीने करण्यात आली असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

रुग्णशोषकांना वठणीवर आनण्यासाठी हा प्रयोग असून, शहरातील सर्व हॉस्पिटलमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या वैद्यकिय उपचार मिळण्याचा अधिकार मुलभूत अधिकाराचा अविभाज्य घटक असल्याचा निर्णय व हॉस्पिटलचे दरपत्रक लावणे गरजेचे आहे. ज्या रुग्णांचे शोषण झाले आहे.

त्यांना ग्राहकमंचच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी संघटना कटिबध्द असून, त्यांनी संघटनेशी संपर्क साधण्याचे आवाहन अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी केले आहे.

सर्वसामान्य रुग्णांची परवड थांबण्यासाठी अ‍ॅड. गवळी, अशोक सब्बन, कॉ. बाबा आरगडे, वीरबहादूर प्रजापती, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, जालिंदर बोरुडे, अशोक भोसले, सखुबाई बोरगे, प्रमिला घागरे, सुरेखा आठरे, बाबासाहेब सरोदे, पोपट भोसले आदि संघटनेचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.

Leave a Comment