आ.लंकेच्या निर्णयाबाबत अनिश्चिती? ‘या’ गावात निवडणूक होणारच

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :-पारनेर मतदारसंघातील आमदार निलेश लंके यांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा आणि २५ लाख मिळवा अशी घोषणा केली होती.

त्या घोषणेला प्रतिसाद म्हणून बऱ्याच गावातील लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन ग्रामपंचायत निवडणुक बिनविरोध करण्याचे पक्के केले होते. याच घोषणेला प्रतिसाद म्हणून नवनागापूर गावातील तीन गटांनी एकत्र येत बिनविरोध निवडणूक घोषित केली.

या बिनविरोध निवडणुकीत गावातील सर्व गटांना समाविष्ट न करण्यात आल्याचे दिसून आले आहे.कारण गावातीलच ग्रामस्थांनी याला विरोध करत लोकशाही पद्धतीने निवडणूक होणारच अशी घोषणा केली आहे.

आमदार लांकेनी केलेल्या घोषणेला गावातील तिन्ही गटांनी पाठींबा दर्शवला होता. तसे पात्रच राष्ट्रवादी भवन येथे आ. लंके याना देण्यात आले होते. यावर काही ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

काही स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी स्वतंत्र्य बैठक घेत बिनविरोधचा निर्णय एकतर्फी घेतल्याचे म्हटले आहे.गावातील सर्वांना विश्वासात घेण्यात आले नाही. ग्रामसभा घेऊन यावर चर्चा झाली नाही .

तरी आमचा या निर्णयाला विरोध आहे अस त्यांचे म्हणणे आहे.गावातील बिनविरोध निवडणुकीचा निर्णय अमान्य असून गावात लोकशाही मार्गाने निवडणूक होणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे.

Leave a Comment