वेग घटला… शंभर सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2020 :- राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून रुग्ण रिकव्हरीचा वेग वाढला आहे. त्यातच जिल्ह्यात आता हळूहळू कोरोनाबाधितांची संख्या घटत असून कोरोनामुक्त रुग्णांचा आकडा वाढत आहे.

यातच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून दिलासादायक वृत्त हाती येत आहे. यामुळे नागरिकांची काहीशी चिंता कमी झाली आहे.

नुकतेच कोपरगाव शहरासह तालुक्यात 12 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील 35 व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली त्यात 6 तर अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठवलेल्या अहवालांपैकी 7 तसेच खासगी लॅब मधील 2 असे 15 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले.

29 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली. दरम्यान कोपरगाव तालुक्यात दि. 28 डिसेंबरपर्यंत एकूण दोन हजार 672 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून दोन हजार 571 रुग्ण बरे झाले आहे.

तर आज पर्यंत एकूण 18 हजार 826 लोकांची करोना चाचणी करण्यात आली. कोपरगावात करोना पॉझिटिव्ह होणार्‍यांची टक्केवारी 14.19. तर मृत्यूचे प्रमाण 1.60 टक्के आहे. 43 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment