देशातील ‘ह्या’ सर्वात वेगवान इलेक्ट्रीक बाईकच्या वितरणास सुरुवात ; ताशी ‘इतक्या’ वेगात धावते ही बाईक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :- देशातील स्वदेशी इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप कंपनी वन इलेक्ट्रिक ने आपल्या इलेक्ट्रिक मोटरसायकल क्रीडनचे वितरण सुरू केले आहे. या बाइकचे नाव संस्कृत शब्द ‘क्रीड़न’ द्वारे प्रेरित आहे ज्याचा अर्थ खेळणे असा आहे.

या बाईकला देशातील सर्वात वेगवान धावणारी इलेक्ट्रिक मोटरसायकल म्हटले जाते. कंपनीने हैदराबाद आणि बंगळुरूमधील ग्राहकांना क्रीडन वितरित करण्यास सुरवात केली आहे.

कंपनीचे म्हणणे आहे की नवीन वर्षात जानेवारी महिन्यापर्यंत ही बाईक तमिळनाडू आणि केरळ आणि त्यानंतर महाराष्ट्र आणि दिल्ली-एनसीआरच्या ग्राहकांना उपलब्ध करुन दिली जाईल. ताशी 95 किलोमीटर वेगाने धावणारी भारतात उपलब्ध असलेली पहिली आणि आतापर्यंत एकमेव बाईक आहे.

या बाईकची एक्स शोरूम किंमत 1 लाख 26 हजार रुपये एवढी आहे. या बाईकला 5.5 किलो वॅट, अर्थात 7.4 बीएचपी क्षमतेची मोटर बसविण्यात आली आहे.

तिचा टॉर्क आऊटपुट 160 एनएम एवढा आहे. बाईकच्या पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक फोर्क तर मागच्या बाजूला दुहेरी शॉक ऍबसॉर्बर्स देण्यात आले आहेत.

बाईकला पुढील चाकाला 240 एमएम डिस्क आणि मागील चाकाला 220 एमएम डिस्क सह कंबाईंड ब्रेक सिस्टीम बसविण्यात आली आहे. ‘KRIDN’च्या उत्पादनासाठी 80 टक्के सुटे भाग स्वदेशी बनावटीचे वापरण्यात आल्याचा दावा कंपनीने केला आहे.

Leave a Comment