रुग्णालयांप्रमाणे सार्वजनिक सभागृह, सरकारी कार्यालय व अपार्टमेंटचे फायर ऑडीट व्हावे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :- सुरक्षिततेच्या दृष्टीकोनाने रुग्णालयांप्रमाणे सार्वजनिक सभागृह, सरकारी कार्यालय व अपार्टमेंटचे फायर ऑडीट व्हावे व शहरातील अग्निशमक दलास अद्यावत सोयी-सुविधांसह

नवीन अग्नीशमनबंब असलेली वाहने उपलब्ध करुन देण्याच्या मागणीचे निवेदन शिवसनेनेचे उपजिल्हाप्रमुख आनंद लहामगे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना ईमेलद्वारे पाठविले.

नुकतेच भंडारा जिल्हा रुग्णालयातील दहा नवजात शिशूंचा आगीने होरपळून मृत्यू झाला. प्रशासनाच्या चुकीमुळे दहा नवाजत शिशू मृत्यूमुखी पडले. या मन हेलावणार्‍या या दुर्घटनेमुळे संपुर्ण महाराष्ट्र हादरला असून, प्रत्येकाचे मन सुन्न झाले आहे.

या घटनेने प्रत्येक जिल्ह्यातील रुग्णालये सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला असताना शासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून, महाराष्ट्रातील सर्वच रुग्णालयांचे फायर ऑडीटचे आदेश देण्यात आलेले आहे.

मात्र हा आगीचा प्रकार फक्त हॉस्पिटल पुरता मर्यादीत नसून, सार्वजनिक सभागृह, सरकारी कार्यालय व अपार्टमेंटचे फायर ऑडीट होणे गरजेचे आहे. फायर ऑडीट करणे बंधनकारक असताना देखील रुग्णालय सार्वजनिक सभागृह, सरकारी कार्यालयांचे नियमीत फायर ऑडीट होत नाही.

काहींनीच फायर ऑडिट केलेले आहे. तर काहींनी फक्त कागदोपत्री फायर ऑडीट झाल्याचे भासवलेले आहे. अनेक ठिकाणी अग्निशमन करणार्‍या सिलेंडरचे नुतनीकरण देखील करण्यात येत नाही.

फायर सेफ्टीसाठी वापरण्यात येणार्‍या साधन सामुग्री हॉस्पिटल व कार्यालयात सुसज्ज अवस्थेत नसतात. प्रशासनाच्या अशा बेफिकरीमुळे भंडारा जिल्ह्यासारखी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जून 2012 मध्ये मंत्रालयाला आग लागून मोठे नुकसान झाले होते. यामध्ये अनेक महत्त्वाची कागदपत्रे जळाली होती. तर भंडारा जिल्ह्यात घडलेल्या या घटनेने पुन्हा फायर ऑडीटचा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

फायर सेफ्टीबाबत सर्वच अनभिज्ञ असून, या घटनेचा धडा घेऊन सुरक्षिततेच्या दृष्टीकोनाने उपाययोजना व्हावी. तसेच अहमदनगर शहरात महापालिकेचे अग्निशमक विभाग असून, यामध्ये जुनाट व जीर्ण झालेल्या दोनच गाड्या असतित्वात आहे.

महापालिकेचे जुने सभागृह आगीत भस्मसात झाले. त्याचवेळी अग्निशमक विभाग अद्यावत करण्याची गरज होती. शहरात मोठी आग लागल्यास इतर ठिकाणाहून अग्निशमकबंब बोलविण्यात येतात. यामध्ये मोठा वेळ वाया जातो. भविष्यातील एखादी मोठी आगीची मोठी दुर्घटना टाळण्यासाठी शहरातील अग्नीशमक विभाग अद्यावत व सुसज्ज करण्याची गरज असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

सदर प्रश्‍नाचा गांभीर्याने विचार करुन सुरक्षिततेच्या दृष्टीकोनाने रुग्णालयांप्रमाणे सार्वजनिक सभागृह, सरकारी कार्यालय व अपार्टमेंटचे फायर ऑडीट व्हावे व शहरातील अग्निशमक दलास अद्यावत सोयी-सुविधांसह नवीन अग्नीशमनबंब असलेली वाहने उपलब्ध करुन देण्याची मागणी शिवसनेनेचे उपजिल्हाप्रमुख लहामगे यांनी केली आहे.

Leave a Comment