प्रेरणादायी ! 12 विद्यार्थ्यांसह सुरु केले होते कोचिंग सेंटर; आता दरवर्षी कमावतायेत 1200 कोटी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :-भारतातील सर्वात मोठी ऑनलाईन एज्युकेशन स्टार्टअप बायजू (BYJU’S) आणि आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात एक मोठा व्यवसाय करार झाला आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, आकाश इंस्टीट्यूट सोबत बायजू 1अब्ज डॉलर्सचा सौदा करणार आहेत.

बायजू आकाश इन्स्टिट्यूट 7500 कोटी रुपयांमध्ये खरेदी करणार आहेत. शैक्षणिक जगतात ही एक मोठी गोष्ट मानली जाऊ शकते कारण 1988 मध्ये अवघ्या 12 विद्यार्थ्यांसह सुरू झालेले आकाश इन्स्टिट्यूट हे कोचिंग सेंटर आज कोट्यवधी रुपयांच्या डील च्या मार्गावर उभे आहे. आकाश एजुकेशनल सर्विसेज कंपनी आकाश इंस्टीट्यूट चालवते.

या संस्थेत वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासाची तयारी करणारे विद्यार्थी शिक्षण घेतायेत. याची बरीच केंद्रे देशभर चालविली जातात. आकाश एज्युकेशन सर्व्हिसेस देशभरात 200 कोचिंग सेंटर चालवित आहेत. विद्यार्थ्यांची संख्या पाहिल्यास ती अडीच लाखाहून अधिक आहे. जर ‘बायजू ‘ ने आकाश संस्था विकत घेतली तर त्याला परीक्षेच्या तयारीच्या क्षेत्रात एक मोठी तेजी मिळेल.

बायजू बरोबर डील :- गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आकाश एजुकेशनल सर्विसेज नी अभिषेक माहेश्वरी यांची कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून नियुक्ती केली. विशेष म्हणजे माहेश्वरी यापूर्वी बायजूच्या आंतरराष्ट्रीय व्यवसायाचे अध्यक्ष होते. जरी या अधिग्रहणाबाबत दोन्ही बाजूंकडून काही सेटमेन्ट आलेले नसले तरीही लवकरच हा करार अंतिम होईल, असे मानले जात आहे.

कोचिंग 12 विद्यार्थ्यांसोबत सुरू झाले होते :- आकाश इंस्टीट्यूटची सुरवात 12 विद्यार्थ्यांसह दिल्लीत झाली. हे कोचिंग सेंटर त्यावेळी खूपच लहान होते. नंतर त्याची व्याप्ती वाढली आणि आज आकाश एजुकेशनल सर्विसेज (AESL) ने आपल्या-33 वर्षांच्या इतिहासातील लाखो विद्यार्थ्यांचे करियर बनवले आहे.

अभियांत्रिकी ते वैद्यकीय क्षेत्रातील लाखो विद्यार्थी आपली स्वप्ने पूर्ण करीत आहेत. जेसी चौधरी हे एईसीएलचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. जे.सी. चौधरी हे संस्थेचे अध्यक्षही आहेत. जे.सी. चौधरी यांनी मेडिकल परीक्षाची तयारी करणाऱ्या 12 विद्यार्थ्यांना दिल्लीत प्रशिक्षण देण्यापासून सुरुवात केली होती.

जे.सी. चौधरी यांची कीर्ती :- 1988 मध्ये सुरू झालेल्या या कोचिंगमध्ये 12 विद्यार्थ्यांपैकी 7 विद्यार्थ्यांनी मेडिकल परीक्षा उत्तीर्ण केली. या कर्तृत्वाने जेसी चौधरी यांचे नाव चर्चेत आले. जे.सी. चौधरी यांनी सुरुवातीच्या काळात सरकारी शाळा व महाविद्यालयात नोकरी केली.

त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा आणि दर्जेदार शिक्षणाचे महत्त्व काय आहे हे त्यांना ठाऊक होते. चौधरी यांना वाटले की मोठ्या परीक्षा उत्तीर्ण होण्यासारखे शिक्षण विद्यार्थ्यांना भेटत नाही. हे लक्षात घेऊन त्यांनी आकाश संस्था सुरू करण्याची योजना आखली. त्यांना या कामात यश आले आणि आज ही संस्था देश आणि जगात परिचित आहे.

आकाश इंस्टीट्यूटमध्ये अनेक कोर्स :- 2006 साली आकाश चौधरी एईसीएलमध्ये रुजू झाले आणि मुंबईत आकाशचे कामकाज सुरू करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली. ते दिवस आठवताना आकाश सांगतात की बऱ्याच शिक्षकांनी इंस्टीट्यूट सोडले होते.

म्हणूनच त्यांनी विद्यार्थ्यांना स्वतः अध्यापन केले. आकाश चौधरी हे आजपर्यंत एईसीएसच्या सर्व व्यवसायाचे कामकाज सांभाळतात तर त्यांचे वडील जेसी चौधरी व्यवसायाशी संबंधित सर्व निर्णय घेतात. आज या इंस्टीट्यूटमध्ये नानाविध प्रकारचे कोर्स सुरु असून विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत.

Leave a Comment