गुगलने घेतला मोठा निर्णय ! ‘त्या’ ॲप्सना प्ले स्टोअरमधून हटवले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- मागील काही दिवसांपासून कर्ज देणाऱ्या फसव्या ॲप्समुळे सामान्यांची फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर गुगलने अशा ॲप्सवर बडगा उगारत त्यांना प्ले स्टोअरमधून हटवले आहे.

सुरक्षा धोरणांचे उल्लंघन करत ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या ॲप्सना प्ले स्टोअरमधून हटवण्यात आले आहे. अशा फसव्या ॲप्सची समीक्षा करून हे पाऊल उचलले असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. ग्राहकांबरोबर आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या कंपन्या तसेच उत्पादनांची सुरक्षा अबाधित ठेवणे, हे आमचे कर्तव्य आहे.

त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे; परंतु यावेळी गुगलकडून कोणकोणत्या ॲप्सना प्ले स्टोअरमधून हटवण्यात आले, त्यांची नावे जाहीर केली नाही; परंतु अशा फसव्या ॲप्सची संख्या ही १०० हून अधिक असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सरकारी संस्था आणि अनेक कंपन्यांकडून गुगलकडे यासंदर्भातील तक्रार करत अशा फसव्या ॲप्सवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने गुगलने ही कारवाई केली आहे.

Leave a Comment