२६ जानेवारीला अहमदनगरमधे ‘ट्रॅक्टर तिरंगा रॅली’ 

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- दिल्ली येथे भारतभरातील शेतकरी संघटना आपल्या न्याय्य हक्कासाठी २६ नोव्हेंबर पासून आंदोलन करत आहेत.

शेतकरी, कामगार व सर्वसामान्य भारतीयांच्याविरोधात असलेले आणि जागतिक भांडवलदारांच्या दबावाखाली केलेले तीन नवीन देशविरोधी कृषी कायदे रद्द करणे आणि कामगार,

कर्मचारीविरोधी श्रमसंहितेलाला विरोध करण्यासाठी दिल्लीत आंदोलन सुरू आहे. सरकार देशप्रेमी अन्नदाता शेतक-यांचे ऐकायला तयार नाही. भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे जाचक कायदे रद्द झालेच पाहिजे.

ही भूमिका व भावना देशभरातील लोकांची आहे. महाराष्ट्रातील शेतकरी कामगार संयुक्त मोर्चाची बैठक दि.१२ जानेवारी रोजी मुंबई येथे पार पडली.

त्यामधे २३ ते २६ जानेवारीला मुंबईत आझाद मैदान येथे महापडाव आणि ध्वजवंदन करण्याचे ठरवले आहे. ज्यांना तेथे जाणे शक्य नाही त्यांनी आपापल्या गावी,

वाडी, वस्ती व शेतात आपल्या ट्रॅक्टरला तिरंगा लावून मी दिल्ली येथील शेतकरी आंदोलकांसोबत आहे. असे सरकारच्या निदर्शनास आणून द्यावे.

येथे आज झालेल्या बैठकीत २६ जानेवारी रोजी अहमदनगर जिल्ह्यात ठिकठिकाणी आणि अहमदनगर शहरात सकाळी ११ वाजता एसटी स्टँड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून

ट्रॅक्टर तिरंगा रॅलीची सुरूवात होईल. रॅलीचा मार्ग पुढे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, चांदनी चौक, स्टेट बँक चौक, इदगाह मैदान,

डीएसपी चौक आणि पत्रकार चौकातील शहीद भगतसिंह यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन करून रॅलीची सांगता होईल.

Leave a Comment