कामावर ठेवलेल्या अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- उत्तर प्रदेशातील अल्पवयीन मुलांना बेकरीत नोकरीला ठेवुन त्यांचा छळ केला. अत्यंत अमानुष वागणूक दिली. एवढेच नव्हे तर एका मुलावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आले.

माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना राहुरी येथे घडली आहे. सामाजिक कार्यकत्यांनी हा प्रकार उघडकीला आणला आहे. राहूरी पोलीस ठाण्यात या प्रकरणी पवन लल्लन यादव, वय २६, रा.दूधई, ता. ‘मतकुईराज, जि. कुशीनगर, उत्तरप्रदेश याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगरच्या पोस्को न्यायालयाने त्याला दि, २१ पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. राहूरी येथील एका बेकरीत अल्पवयीन मुलांना कामावर ठेवून त्यांचा छळ केला जातो. अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्यांना मिळाली. त्यांनी बेकरीला भेट दिली. त्यावेळी बेकरीत लहान मुले काम करताना आढळली.

कार्यकर्त्यांनी लहान मुलाशी चर्चा केली असता त्यांनी छळाची कहाणी ऐकवली. हे ऐकून कार्यकते गहिवरले. त्यांनी त्वरित पोलिसांना पाचारण केले. सामाजिक कार्यकर्ते नीलेश जगधने, पिंटू साळवे, अनिल जाधव, कांतीलाल जगधने, दपक आव्हाड, डॉ. जालिंदर धिगे, मयूर सूर्यवंशी, संदीप कोकाटे,

चंद्रकांत जगधने, सतिश बोरुडे यांनी या मुलाची छळछावणीतून सुटका केली. कुशीनगर जिल्ह्यातून या अल्पवयीन मुलांना कामासाठी आणण्यात आले होते. त्यांना रात्री पुरेशी झोप येऊ दिली जात नव्हती. रात्री वेळीअवेळी कामावर बोलावले जात असे.

दमदाटी करुन मारहाण करून काम करून घेतले जात होते. त्यांना चटके दिले जात असे. पुरेसे खायला दिले जात नसे, एका मुलावर अनेकदा अनैसर्गिक अत्याचार केले. त्यांना पगाराचा हिशोब दिला जात नसे.

हे अत्याचार मुलांनी ऐकविले. ते ऐकून कार्यकर्ते सुन्न झाले. त्यानंतर आरोपी पवन यादव याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.ओमप्रकाश जोखनगिरी गिरी, वय ३१ रा. नयना, ता. तमकुईराज, जि. कुशीनगर, उत्तर प्रदेश याने फिर्याद दिली असून पोनि हनुमंत गाडे अधिक तपास करीत आहेत.

Leave a Comment