मोठी बातमी ; सॅमसंगच्या व्हाईस चेअरमन यांना अटक, काय आहे प्रकरण ? जाणून घ्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :- जगातील सर्वात मोठी स्मार्टफोन आणि मेमरी चिप निर्माता सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे व्हाईस चेअरमन ली जै-योंग यांना लाचखोरी व भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली दोषी ठरविण्यात आले आहे.

या प्रकरणात योंगला अडीच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दक्षिण कोरियाचे माजी अध्यक्ष पार्क ग्यून यांच्यावर देखील आरोप आहे. योंग यांच्यावर लावण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये 200 कोटींची लाच देण्याचाही समावेश आहे.

दक्षिण कोरियाच्या एका कोर्टाने 2016 च्या भ्रष्टाचार घोटाळ्यामध्ये सामील झाल्याबद्दल त्याला अडीच वर्षाची शिक्षा सुनावली. या घोटाळ्यामुळे देशात व्यापक विरोध प्रदर्शन झाले आणि तत्कालीन दक्षिण कोरियाचे अध्यक्ष पार्क ग्यून यांना हे पद सोडावे लागले.

यासाठी दिली होती लाच –

बहुप्रतिक्षित खटल्यात सियोल हायकोर्टाने ली याना तत्कालीन अध्यक्ष पार्क ग्यून-हे आणि त्याच्या जवळच्या व्यक्तीला लाच देताना दोषी ठरवले. 2015 मध्ये सॅमसंगच्या दोन भागीदार कंपन्यांच्या विलीनीकरणासाठी ली ला सरकारची मदत हवी होती आणि म्हणूनच त्याने अध्यक्ष पार्क ग्यून-हे आणि त्याच्या जवळच्या व्यक्तीला लाच दिली.

या करारामुळे लीच्या देशातील सर्वात मोठ्या व्यापारी गटावरील नियंत्रण आणखी मजबूत झाले.

ली च्या वकिलांचे युक्तिवाद –

ली च्या वकिलांनी त्याला राष्ट्रपती पदाच्या गैरवर्तनाचा बळी म्हणून वर्णन केले आणि 2015 च्या कराराचे वर्णन “सामान्य बिजनेस एक्टिविटी” म्हणून केले. कोर्टाच्या निर्णयानंतर लवकरच ली ला ताब्यात घेण्यात आले. ली जेलमध्ये गेल्याची ही पहिली वेळ नाही.

यापूर्वी तो 2017 मध्ये कैदेत होता. असं असलं तरी, उच्च न्यायालयात अपील केल्यानंतर ते तुरूंगातून बाहेर आले होते.

Leave a Comment