खासदारांना 35 रुपयांना मिळाणारं जेवण बंद; मोदी सरकारने घेतला निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :-भारतीय संसद भवनात खासदारांना जेवणावर मिळत असलेली सबसिडी थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यामुळे यापुढे खासदारांना पार्लमेंट मध्ये जेवणासाठी अनुदान मिळणार नाही. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज याबाबतची माहिती दिली.

लोकसभा स्पीकर ओम बिर्ला म्हणाले की, संसदेच्या कॅन्टीनमध्ये जेवणावर देण्यात येणाऱ्या सबसिडीला संपविण्याविषयीची चर्चा दोन वर्षांपूर्वी देखील झाली होती.

त्यावेळी लोकसभेच्या बिझिनेस अ‍ॅडव्हायझरी समितीतील सर्व पक्षांच्या सदस्यांनी एकमत होत संसदेतील जेवणावर मिळणारी सबसिडी बंद करण्याचे मान्य केले होते.

त्यानंतर आता हा निर्णय लागू करण्यात आल्याचे लोकसभेच्या अध्यक्षांनी आज सांगितले. कँटिनमधील जेवणची किमंत लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांना नाममात्र दरात जेवण मिळत होते.

जेवणाच्या एका थाळीची किंमत 35 रुपये होती. केंद्र सरकारडून सबसिडी दिली जात असल्यामुळे इतक्या कमी रकमेत जेवण दिले जात असे.

मात्र, खासदारांच्या जेवणावरील सबसिडी बंद केल्यामुळे केंद्र सरकारचे 8 कोटी रुपये वाचणार आहेत. संसदेतील कॅन्टीनला जेवणासाठी दरवर्षाला सुमारे 17 कोटी रुपयांचे अनुदान दिले जात होते.

जे यापुढे दिले जाणार नाही. यापूर्वी 2017-18 मध्ये माहिती अधिकारात उघड झालेल्या माहितीनुसार, संसदेच्या कॅन्टीन मध्ये नॉनव्हेज चिकन करी 50 रुपयांना आणि व्हेज राईस प्लेट 35 रुपयांना मिळत होती.

याशिवाय साधा डोसा संसदेत केवळ 12 रुपयांमध्ये मिळत असे. परंतु आता संसदेतील कॅन्टीन मध्ये देखील खाद्यपदार्थ बाजार भावानुसार मिळणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button