रिलायन्सचा धमाका ! जेवढ्या रुपयांची वस्तूची बुकिंग तेवढ्या रुपयांची अतिरिक्त सूट ; वाचा अन फायदा घ्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :-प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने रिलायन्स डिजिटलने ‘रिपब्लिक डे डिजिटल इंडिया सेल’ ऑफर केली आहे. सेल दरम्यान ग्राहकांना प्री-बुकिंगच्या आकर्षक ऑफर्स मिळत आहेत.

कंपनीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डिजिटल इंडिया सेल 22 ते 26 जानेवारी 2021 पर्यंत चालणार आहे आणि प्रीबुकिंग कालावधी 18 ते 20 जानेवारी दरम्यान असेल. 18 ते 20 जानेवारी या कालावधीत ग्राहकांना 1000 रुपयांची आगाऊ रक्कम देऊन रिलायन्स डिजिटल कडून त्यांच्या पसंतीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे प्रिबुक करता येईल.

त्या बदल्यात त्यांना डिजिटल इंडिया सेल दरम्यान इन्स्टंट सूट व विशेष ऑफर्ससह 1000 रुपयांची अतिरिक्त सूट देखील मिळणार आहे. ग्राहकांना हवे असल्यास, ते कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूची 2000 रुपयांमध्ये प्रीबुक करू शकतात. या प्रकरणात, त्यांना ईएमआयवर 2000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल.

 ऑनलाइन / ऑफलाइन खरेदी कशी करावी :- 22 आणि 26 जानेवारी दरम्यान डिजिटल इंडिया सेल दरम्यान प्री-बुकिंगच्या फायद्यांसह सर्व ऑफर मिळू शकतात. ग्राहक रिलायन्स डिजिटल स्टोअरमधून ऑनलाइन किंवा ऑफलाइन खरेदी करू शकतात.

प्री-बुकिंगसह सर्व ऑफर रिलायन्स डिजिटल, माय जिओ स्टोअर्स व ऑनलाइन www.reliancedigital.in वर उपलब्ध आहेत. रिपब्लिक डे डिजीटल इंडिया सेल मधील ग्राहकांना मोठ्या बँका आणि वित्तीय संस्थांच्या वतीने इंस्टैंट डिस्काउंटही मिळणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

रिलायन्स डिजिटल 800 शहरांमध्ये उपलब्ध आहे :- रिलायन्स डिजिटल हा भारतातील सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक रिटेलर आहे. रिलायन्स डिजिटलची देशातील 800 हून अधिक शहरांमध्ये उपस्थिती आहे, 550 पेक्षा जास्त रिलायन्स डिजिटल स्टोअर आणि 1800 पेक्षा जास्त माय जियो स्टोअर्स आहेत.

रिलायन्स डिजिटलशी संबंधित 200 हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रांडशी जोडलेले आहेत. रिलायन्स डिजिटलने 5000 हून अधिक उत्पादने विकली आहेत. रिलायन्स डिजिटल देखील आपल्या आफ्टर सेल्स सर्विस प्रदान करते.

Leave a Comment