‘हे’ टाळण्यासाठी निवडणुकीनंतर सरपंचपदासाठी आरक्षण सोडत काढण्याचा निर्णय झाला !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :- राज्यातील १४ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. सरपंचपद मिळवण्यासाठी होणारे गैरप्रकार टाळता यावेत,

यासाठी ग्रामविकास विभागाने निवडणूक झाल्यानंतर सरपंचपदासाठी आरक्षण सोडत काढण्याचा निर्णय घेतला होता.

या पार्श्वभूमीवर मंत्री मुश्रीफ यांनी सरपंचपदासाठी लवकरच सोडत काढणार असल्याचे सांगितले. ग्रामपंचायत निवडणुकीआधी सरपंचपदासाठी सोडत काढल्यानंतर पद मिळवताना सरपंचपदासाठी बोगस जात प्रमाणपत्र सादर करणे, असे गैरप्रकार होत असल्याचे ग्रामविकास विभागाच्या लक्षात आले.

ज्या प्रवर्गासाठी सरपंचपद आरक्षित असल्याचे त्या प्रवर्गाच्या प्रभागात चुरशीने निवडणूक व्हायची. हे टाळण्यासाठी निवडणुकीनंतर आरक्षण सोडत काढण्याचा निर्णय झाला. त्यामुळे यावेळच्या ग्रामपंचायत निवडणुकांत मतदान टक्­केवारीतही ४ टक्­क्­यांनी वाढ झाली. २०१४-१५ मध्ये ७६ टक्­के असणारे मतदान या वेळी ८० टक्­क्यांवर गेल्­याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

ग्रामसभा आयोजित करण्याच्या निर्णयाला ३१ मार्चपर्यंत स्थगिती दिली जाण्याची शक्यता आहे. ग्रामविकास विभागाने ग्रामसभांना परवानगी दिली आहे. मात्र, सध्या अनेक ग्रामपंचायतींवर प्रशासक आहेत. एका प्रशासकाकडे चार ते पाच ग्रामपंचायतींचा कारभार आहे.

एका प्रशासकाला एकाचवेळी इतक्­या ठिकाणी ग्रामसभेला हजर राहणे शक्य नाही. त्यामुळे ग्रामसभा आयोजित करण्याच्या निर्णयाला ३१ मार्चपर्यंत स्थगिती दिली जाऊ शकते. याचा निर्णय बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत होऊ शकतो, असेही मंत्री मुश्रीफ म्हणाले.

Leave a Comment