दारू पिऊन गाडी चालवल्यास १० हजार रुपये दंड ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :-तळीरामांकडून वारंवार होणारे नियमांचे उल्लंघन आणि वाढणाऱ्या अपघातांवर नियंत्रण राहावे, यासाठी तळीराम वाहनंचालकांना दणका देण्यासाठी राज्य सरकार पुढे सरसावले आहे.

दारू पिऊन गाडी चालवल्यास १० हजार रुपये दंड आकारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. राज्यातील अपघातांचे प्रमाण कमी व्हावे आणि सुरक्षितता नियमांचे पालन व्हावे,

यासाठी राज्यातील वाहतूक दंड वाढवण्यात येणार आहे. राज्याने केंद्रात पाठवलेल्या प्रस्तावाबाबत दिल्लीतील बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांना १० हजार रुपये दंड आकारण्याची शक्यता आहे, तर विनापरवाना स्टेअरिंगवर बसणाऱ्यांवर ५ हजार रुपये दंड आकारला जाण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारने मोटर वाहन कायदा २०१९ मध्ये केलेल्या बदलांच्या अंमलबजावणीबाबत देशातील विविध राज्यांतील परिवहनमंर्त्यांची बैठक मंगळवारी व बुधवारी दिल्लीत पार पडली. नव्या नियमांनुसार वाहतूक दंडात वाढ होणार आहे.

Leave a Comment